मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अमेरिकेत आता नग्न डिनर पार्ट्यांचा फंडा  Search similar articles
एएनआय
अमेरिकेत कधी कसले फॅड निघेल काही सांगता येत नाही. मुळातच अमेरिकन लोकांना जास्त कपडे असलेले चालत नाहीतच. त्यातच सध्या उन्हाळ्यामुळे रात्रीचे जेवण (डिनर) आणि योग या दोन क्रिया बरीचशी मंडळी कपडे न घालता करत आहेत. थोडक्यात नग्न रहाण्याचे वेड या मंडळींना लागले आहे.

एवढेच नव्हे तर रात्रीच्या नग्न डिनर पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. हॉटेलवाल्यांनीही तशी सोय उपलब्ध करून दिली आहे. जॉन ओर्डोव्हर हा हॉटेलमालक अशा पार्ट्यांना आपले हॉटेल उपलब्ध करून देतो. तो स्वतःही अशा पार्ट्या आयोजित करतो. तो म्हणतो 'नग्न असताना अतिशय आरामदायी वाटते. आम्ही हे करतो ते कुणाला धक्का द्यावा किंवा बघ्यांच्या नजरेला पडावं म्हणून नाही. पण इतरांना नग्न रहाणं अवघडल्यासारखं वाटतं. आम्हाला उलट त्याच अवस्थेच आरामदायी वाटतं.'

नग्न डिनर पार्ट्यांप्रमाणेच आता 'योगसाधना'ही नग्न राहून करण्याचा फंडा आला आहे. 'नग्न राहून योगसाधना केल्याने माझ्यात बराच बदल घडल्याचे मला जाणवले. स्वतःचा शोध घेण्यासाठी मला त्यामुळे मदत झाली, असे इसिस फिनिक्स नावाच्या एका योगशिक्षकाने सांगितले. त्याच्या योगाक्लासमध्ये दहा विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी दोन नियम आहेत. एक म्हणजे अंगावर कोणतेही कपडे ठेवायचे नाहीत आणि बसायला स्वतःचे बस्तर आणायचे.

सुरवातीला नवीन आलेल्यांना विचित्र वाटते. पण हळूहळू ही भावना निघून जाते, असे फिनिक्स यांनी सांगितले. शहरातल्या काही कॉमेडी क्लबमध्येही हा फंडा आता रूजू लागला आहे.
आणखी
नेपाळमध्ये राष्ट्रपती निवडणुकीत माजोवाद्यांना झटका
खान यांना कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी
वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न
पाकमध्ये परकीय सेनेस प्रवेश निषिद्ध: गिलानी
पाकमध्ये दोन गटात संघर्ष, 15 ठार
ब्रिटन इराकमधून लष्कर मागे घेणार