धुक्यामुळे अमेरिकेत सध्या अपघातांमध्ये वाढ झाली असून, काल एक छोटे विमान अमेरिकेतील एका घरावर कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
उत्तरी भागातील ओरेगॉन भागात हा अपघात झाला. एक इंजिन असलेले हे विमान आधी एका झाडावर कोसळले यानंतर ते त्या झाडा शेजारील घरावर पडले.
वैमानिक आणि विमानातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर ज्या घरावर विमान कोसळले त्या घरातील दोघांचा मृत्यू झाला. यात मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
|