मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > पाक कारवाईत 94 दहशतवादी ठार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाक कारवाईत 94 दहशतवादी ठार Search similar articles
वार्ता
पाकिस्तानच्या कबायली भागातील स्वात घाटीच्या मट्टा आणि कबल भागात गेल्या पाच दिवसांपासून पाक सैन्याने केलेल्या कारवाईत 94 दहशतवादी मारल्या गेल्याचा दावा पाक लष्कराने केला आहे. यात पाचे 14 सैनिकही मारले गेल्याचे लष्कराने कबुल केले.


पाकच्या स्वात घाटीत मोठ्या प्रमाणावर तालिबानी दहशतवादी आहेत. त्यांनी या भागात आपले अनेक अड्डे बनवले असून, या भागातून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया केल्या जातात.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून वाढत्या दबावामुळे पाक सरकारने अखेर या भागात लष्कर कारवाई सुरू केली आहे. पाकमध्येही गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यानंतर पाक सरकारने स्वात भागात सैन्य अभियान सुरू केले आहे.

या कारवाईत 94 दहशतवाद्यांसह 28 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती ब्रिगेडीअर झिया बोडल यांनी दिली. स्थानिक प्रशासनाच्या विनंती नंतरच हे अभियान सुरू करण्यात आले असून, दहशतवाद्यांनी शांतता कराराचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती बोडला यांनी दिली.
आणखी
अमेरिकेत विमान अपघातात चार ठार
ब्रिटनमधील मुलीची ब्राझीलमध्ये निर्घृण हत्या
हिंदीविरोधी आंदोलनाने नेपाळ प्रभावित
नेपाळमध्ये मधेशी पक्ष सरकारबाहेरच राहणार
मुशर्रफ उतरले आयएसआयच्या समर्थनार्थ
ब्रिटिश कार शिवाय 'बेकार'