मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > नेपाळमध्ये माओवादी करणार सरकारचे नेतृत्व
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नेपाळमध्ये माओवादी करणार सरकारचे नेतृत्व Search similar articles
भाषा
नेपाळमधील चार प्रमुख पक्षांमध्ये माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सर्वसंमतीचे सरकार स्थापण्याबाबत सैद्धांतिकदृष्ट्या सहमती झाल्याने चार महिन्यांपासूनची राजकीय अनिश्चितता संपण्याचे संकेत आहेत.

मात्र किमान समान कार्यक्रमाबाबत त्यांच्यात अद्याप सहमती झालेली नाही. सीपीएन-माओइस्ट, नेपाळी कॉंग्रेस, सीपीएन'यूएमएल व मधेशी राइटस फोरम यांच्यात काली रात्री झालेल्या बैठकीत माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यास सहमती झाल्याचे नेपाळी कॉंग्रेसचे प्रवक्ते अर्जुन नर्सिंग खत्री छेत्री यांनी सांगितले.

राष्ट्रीय सरकारची स्थापना करून शांती प्रक्रियेस अंतिम टप्प्यांत नेण्यासाठी माओवादी व अंतरिम सरकारमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणीबाबत त्यांच्यात निर्णय झाला.
आणखी
मॅकेन यांची सर्वेक्षणात ओबामांवर आघाडी
पाक कारवाईत 94 दहशतवादी ठार
अमेरिकेत विमान अपघातात चार ठार
ब्रिटनमधील मुलीची ब्राझीलमध्ये निर्घृण हत्या
हिंदीविरोधी आंदोलनाने नेपाळ प्रभावित
नेपाळमध्ये मधेशी पक्ष सरकारबाहेरच राहणार