मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > मुशर्रफांवर महाभियोग भरण्याबाबत सहमती
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुशर्रफांवर महाभियोग भरण्याबाबत सहमती
भाषा
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यासमोर आठ वर्षातील कारकीर्दीतील अस्तित्वाचे सर्वाधिक गंभीर संकट उभे ठाकले आहे. सत्ताधारी आघाडीने आरोपत्राचा मसुदा तयार केल्यानंतर त्यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या निर्णयावर विचार करत आहे.

पाकिस्तान पीपल्स पक्षाचे असिफ अली झरदारी व पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे नेते नवाझ शरीफ यांनी मुशर्रफांवर महाभियोग चालवणे अत्यावश्यक असल्याच्या निर्णयाप्रत सत्ताधारी आघाडी आल्याचे स्पष्ट केले.

लोकशाहीसाठी ही चांगली बातमी आहे. महाभियोगाची कारवाई लवकरच सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, असे झरदारी यांनी सांगितले. शरीफ यांच्याशी झालेल्या तीन दिवसांच्या चर्चेत बडतर्फ न्यायमूर्तींना पदबहालीचा निर्णयही झाला आहे.

दरम्यान मुशर्रफांनी आणीबाणीची परिस्थिती पाहता बीजिंग भेट रद्द करून समर्थक सहायकांना संपर्कास सुरूवात केली आहे. मुशर्रफ संसदेच्या बरखास्तीसहित काळजीवाहू सरकारच्या नेतृत्वात आणीबाणी लागू करू शकते, अशी अटकळ लावण्यात येत आहे.
आणखी
इंडोनेशियात जबरदस्त भूकंप
मुशर्रफ यांच्याविरूद्ध महाभियोगाची कारवाई?
नेपाळचा चीनविरोधी निदर्शकांना कारवाईचा इशारा
परवेझ मुशर्रफांनी थोपटले सरकारविरूद्ध दंड
बेनझीर खून खटल्याची सुनावणी तहकूब
चिनमध्ये पुन्हा भूकंप, 1 ठार 23 जखमी