पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठीचे प्रमुख दावेदार समजले जात असलेले पीपीपीचे नेते आसिफ अली जरदारी हे मानसिक दृष्ट्या अपंग असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून समोर आली असून अमेरिकेने या विषयावर नाराजी व्यक्त केली आहे.
जरदारी यांच्या प्रवक्त्याने ते आता मानसिक रोग मुक्त झाल्याचा दावा केला असला तरीही अमेरिकन अधिका-यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. येत्या 6 सप्टेंबरच्या निवडणुकीत जरदारी विजयी झालेच तर पाकच्या ताब्यातील अण्वस्त्रांवर जरदारी यांचे नियंत्रण राहणार असल्याने त्याबद्दल सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार केला जात आहे.
|