दुबई शहरापासून जवळच समुद्रात एक हेलीकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोघा भारतीयांसह सात जण ठार झाले. दोन भारतीयांची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
यूएई प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार बी 212 हेलीकॉप्टरने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. यानंतर अवघ्या काही वेळातच या हेलीकॉप्टरला अपघात झाला.
|