अफगाणिस्तानातील फराह प्रांतात आज अमेरिकी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात सात जण मारले गेले. तालिबानी कमांडरचा घराला लक्ष करून हे हल्ले करण्यात आले होते.
या हल्ल्यात दोन मुलांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त असून, ज्या कमांडरला लक्ष करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला तो कमांडर यात मारला गेला का नाही ते अद्याप कळू शकले नाही.
नागरी भागात अमेरिकी सैन्य हल्ले करत असल्याने यात निरपराध्यांचा बळी जात असल्याने यापूर्वीच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमिद करझई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
|