पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसीफ अली जरदारी यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाच्या आघाडी सरकारने पाठिंबा काढून घेतल्यानंतर राष्ट्रपती पदासाठी त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. असे असले तरीही जरदारी यांचा विजय निश्चित समजला जात आहे.
राजकीय विश्लेषकांनी केलेल्या अभ्यासानुसार 700 सदस्यांच्या निवडमंडळात 60 टक्के मते जरदारी यांना मिळण्याची शक्यता आहे.
जरदारी सुरक्षेच्या कारणावरून सध्या इस्लामाबादेत नाहीत. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी पीएमएल एनचे उमेदवार न्या.सईद उज्जमन सिद्दकी आणि पीएमएल क्यूचे मुशाहिद हुसैन यांचे देशभर दौरे सुरू आहेत.
|