पाकिस्तानला दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिकेकडून दिला जाणारा निधी पाकडून भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे डेमोक्रटीक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांनी केला आहे.
वॉशिंग्टनकडून पाकला दहशवाद रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो मात्र त्याचा वापर योग्य कामासाठी होत नाही. तर पाककडून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. आपल्याला अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रीतकरून पाकला दबावाखली ठेवण्याची गरज असल्याचेही ओबामा यांनी सांगितले.
अल-कायदा प्रमुख ओसामा बीन लादेन याचा कोणत्याही परिस्थिती छडा लावण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
|