पाकिस्तानी संसदेच्या सदस्यांनी आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान केले. या निवडणुकीत सत्ताधारी पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष असीफ अली झरदारी हेच विजयी होतील, अशी अपेक्षा आहे.
श्री. झरदारी यांच्यासह पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) सईद उझ झमान तसेच पाकिस्तान मुस्लिम लीगचे (कायदे आझम) मुशाहिद हुसेन सईद हेही निवडणूक रिंगणात आहेत. नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीगने सत्ताधारी पीपीपीचा पाठिंबा काढून घेतला असला तरीही झरदारी यांच्या विजयात अडसर येणार नाही, असे राजकीय चित्र आहे. कारण अनेक छोटे राजकीय पक्ष झरदारींच्या मागे उभे आहेत.
|