तालिबानी नेते चर्चेला तयार असल्याच्या केवळ अफवाच असून, मुल्ला उमरने असे कोणतेही संकेत दिले नसल्याचे व्हाईट हाउसने स्पष्ट केले आहे.
व्हाईट हाउस प्रवक्ते गोर्डन जॉनड्राय यांनी दिलेल्या माहितीनुसार मुल्ला उमरने अद्याप कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे त्यांना शांतता चर्चा करायची आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे मत अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई यांनी व्यक्त केल्याचे गोर्डन म्हणाले. |