भारताच्या वाढत्या अणू शक्तीची चिंता जर्मनीला भेडसावत असून, अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या 123 अणू करारासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत करण्यास जर्मनीने नकार दिला आहे.
समाधानाची बाब हिच की देशातील खाजगी कंपन्यांना इंधन पुरवठा करण्यास आपण रोखणार नसल्याचे जर्मनीने स्पष्ट केले आहे.
भारताला सहकार्य करण्यास आपण तयार आहोत परंतु देशाचे कायदे याला संमती देत नसल्याने भारताला कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत पुरवण्यास जर्मनी तयार नसल्याचे मत जर्मनीचे पर्यावरण मंत्री सिगमार गाब्रियल यांनी व्यक्त केले आहे.
अणू ऊर्जा निर्मितीला जर्मनीचा विरोध असून, गेल्या काही दिवसांमध्ये भारताने आपली अणू ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याने जर्मनीने चिंता व्यक्त केली आहे. |