इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर काल झालेल्या भूकंपानंतर घाबरलेल्या सुमारे १० हजार लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असल्याची माहिती इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवारी) दिली.
येथील सुलावेसी बेटाला काल (सोमवारी) बसलेल्या ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या झटक्यात सहा ठार झाले असून शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत.
इंडोनेशियाच्या भूगर्भ खात्याने भूकंपानंतर सूनामीचा इशारा दिला होता. |