गेली अनेक वर्षे अमेरिका ज्याच्या मागे हात धुऊन लागलेली आहे, त्या ओसामा बिन लादेनबाबत अजूनही आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचा नामुष्कीजनक खुलासा सरकारला करावा लागला आहे.
लादेनप्रकरणी सरकारने बराच काळ मौन बाळगले होते. पण ते सोडताना व्हाईट हाऊसचे प्रवक्ता डाना पेरीनो यांनी सांगितले की आपल्याला खरी माहिती पाहिजे असेल तर कृपया आपण गुप्तचर संस्थांशी संपर्क साधावा. आमच्याकडे लादेनबाबत काहीही माहिती नाही.
अल कायदाच्या दुसर्या क्रमांकाचा नेता अयमान अल झवाहिरीने अफगाणिस्तानात आणखी सैनिक पाठविण्याविरोधात नवे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना इशारा देणारा व्हिडीओ नुकताच जारी केला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. |