पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या जादूई अदावर फिदा असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्तान टाइम्स लिडरशिप संमेलनाला इस्लामाबादवरून व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे संबोधित करताना आपल्याला कोणती भारतीय अभिनेत्री आवडते असा प्रश्न विचारला असता त्यांनी माधुरी दीक्षित आपल्याला आवडत असल्याचे सांगितले.
भारत-पाकिस्तान संबध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चित्रपट व्यवसायाचे आदान प्रदान व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान व पत्नी बेनझीर भुत्तो कायम माझ्या मनात असून त्या मला नेहमी मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले. |