तालिबानी नेता मुल्ला उमरला शस्त्रास्त्र टाकण्याच्या अटीवर राजकीय आश्रय दिला नसल्याचे आज सौदी अरबने स्पष्ट केले.
जर्मनीच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही बातमी खोटी असून केवळ अफवा पसरविण्याचे कार्य केले जात असल्याचे अरब वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सौदी अरब परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकार्याने सांगितले. सौदी अरबचे शाह अब्दुल्ला यांनी मुल्ला उमरला राजकीय आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताचे खंडन करताना एका सौदी अधिकार्याने हे वृत्त चुकीचे असून असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव उमर यांच्यापुढे मांडला नसल्याचे सांगितले. |