इराकवर हल्ला केल्याने अमेरिकेची अवस्था अवघड झाली असून, युद्ध इतक्या लवकर संपून अमेरिकेवर इराकच्या निर्माणाची जबाबदारी येईल असे अमेरिकेला मुळीच वाटले नव्हते असा खुलासा अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ गेरी समोर यांनी केला आहे.
रोनाल्ड रेगन ते जॉर्ज बुश यांच्यापर्यंत विविध राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात अत्यंत महत्त्वपूर्ण पद सांभाळलेल्या समोर यांनी इराक हल्ला हा अमेरिकेची सर्वात मोठी ऐतिहासिक चूक असल्याचे म्हटले आहे.
ओबामांच्या कार्यकाळात भारतावर सीटीबीटीवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यताही समोर यांनी व्यक्त केली असून, पाकचे आर्थिक दिवाळे निघाले असल्याने पाकला अमेरिका विशेष आर्थिक मदत करेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. |