दहशतवादाविरुध्द भारताने सुरू केलेला लढा संपूर्ण जगाचा लढा असून यास अमेरिकेचे पूर्ण सहकार्य आहे, अशी भूमिका राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यु. बुश यांनी जाहीर केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना बूश यांनी मुंबईतील हल्ल्याच्या तपासासाठी गरज पडल्यास अमेरिकेकडून एफबीआयचे आणखी एक पथक पाठविले जाईल असे आश्वासन दिले आहे.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमेरिका आंतरराष्ट्रीय समुदायाचे समर्थन मिळविण्यासाठी भारताच्या बाजूने उभी राहणार असल्याचे व्हाइर्दट हाऊसकडून जाहीर करण्यात आले आहे. |