गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची नाड पाकिस्तानशी जुडली आहे. मात्र, या गोष्टीची खंडण करताना पाकिस्तानने नकार दिला असून मुंबई हल्ल्याप्रकरणी पुरावे मागितले आहे.
मुंबई हल्लाची नाड पाकिस्तानशी जुडली असेल तर तसे पुरावे पाठवावे, असे पाकिस्तानने भारताला कळवले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात असलेला तणाव भविष्यात वाढू देणार नाही तर मैत्रीपूर्ण संबंध जोपासले जातील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी म्हटले आहे.
भारतातला मुंबईत झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात दिसत असेल तर पूरावे सादर करावेत. तसेच ती पुरावे पाकिस्तानात ही पाठवावेत, गिलानी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोंडोलिजा राइस यांनी सांगितले की, पाकिस्तान मुबंई हल्ला प्रकरणी तपासकार्यात भारताला पूर्ण सहकार्य करेल. मात्र, विशेष म्हणजे यानंतरच गिलानी यांनी वक्तव्य केले आहे.
दोन्ही राष्ट्रामधील स्थिति नियंत्रित राहण्यासाठी इस्लामाबादने इतर देशांशी त्या संदर्भात चर्चा सुरू केली आहे. यावर पाकिस्तानी वायुसेनेचे प्रमुखने सांगितले आहे की, देशासमोर येणार्या प्रत्येक आव्हाण पेलण्यासाठी ते सक्षम आहेत. |