मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > मुंबई हल्ल्यासंबंधी वार्तांकनासाठी बीबीसीला फटकार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबई हल्ल्यासंबंधी वार्तांकनासाठी बीबीसीला फटकार
भाषा
बीबीसीने आपल्या बातमीपत्रात मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवणार्‍या हल्लेखोरांच्या टोळीस 'दहशतवादी' न संबोधण्यासाठी मजूर पक्षाच्या संसद सदस्यांनी फटकारले आहे.

मात्र ब्रिटनस्थित बीबीसीने या पायदंडाचे समर्थन केले आहे. त्यांनी हल्लेखोरांना 'बॉम्बर्स' किंवा 'हल्लेखोर' संबोधणे पसंत केले होते. लेबर पक्षाचे स्टिफन पाउंड यांनी बीबीसी वृत्तवाहिनीच्या या कृतीवर कडाकडून टिका करताना दहशतवाद ही जागतिक संज्ञा असल्याचे म्हटले आहे.

मशीन गन्स घेऊन दहशतवाद्यांनी निष्पाप व्यक्तिंना ठार केले. ते दहशतवादी असून बीबीसीने त्यांना दहशतवादी संबोधायला पाहिजे होते, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात परदेशी नागरिकांसहित दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला होता. मात्र आम्ही त्यांना 'स्वातंत्र्ययोद्धे' संबोधत नसून 'बॉम्बर्स' म्हणून संबोधल्याचे सांगून वृत्त देण्याच्या पद्धतीचे समर्थन केले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
थायलॅंडमध्ये विमानतळावर बॉम्ब स्फोट
इराकमध्ये बॉम्ब हल्ल्यात 15 ठार
पाकमध्ये आत्मघातकी हल्ल्यात आठ ठार
दहशतवादाविरुध्‍दच्‍या युध्‍दात भारताला पूर्ण सहकार्यः बूश