मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > राइस आज भारतात येणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राइस आज भारतात येणार
भाषा
भारत आणि पाकिस्तानमध्‍ये वाढत चाललेल्‍या तणाव पूर्ण परिस्थितीच्‍या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन परराष्‍ट्रमंत्री कोंडलीजा राइस आज भारत दौ-यावर येत आहेत. मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर राष्‍ट्राध्‍यक्ष बुश यांनी त्‍यांना परिस्थितीची माहिती घेण्‍यासाठी भारतात पाठविले आहे.

या दौ-यात भारताकडून राइस यांना हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा सहभाग असल्‍याचे पुरावे सादर केले जाणार आहेत. या दौ-यात त्‍या पंतप्रधान मनमोहन सिंह, परराष्‍ट्र व्‍यवहारमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. गृहमंत्री पी. चिदंबरम आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार एम. के. नारायणन यांचीही त्‍या भेट घेण्‍याची शक्‍यता आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
पाक जगासाठी डोकेदुखी- अलब्राईट
ओबामांनी पाकला फटकारले
मुंबई हल्ल्यासंबंधी वार्तांकनासाठी बीबीसीला फटकार
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
थायलॅंडमध्ये विमानतळावर बॉम्ब स्फोट