इराकवरील हल्ला ही माझ्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी चूक होती. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती चुकीची निघाल्याने यात अनेक निरपराध मारले गेल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश यांनी मान्य केले आहे.
आपली कारकिर्द संपत असल्याने यासंदर्भात बूश यांनी 'एबीसी' या वृत्तसंसथेला दिलेल्या एका मुलाखतीत बूश यांनी आपण युध्दासाठी पूर्ण तयार नसल्याचेही मान्य केले आहे. मला युध्द करावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते मात्र तसे घडले. सध्याच्या काळात राष्ट्रपतींच्या कारकिर्दीत त्यांना अपेक्षित नसलेल्याही अनेक गोष्टी घडत असतात.
सद्दाम हुसैन यांची सत्ता उलथून देण्यामागे अण्वस्त्रे हा मुख्य मुद्दा होता. |