पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात न देण्याच्या उन्मत्त विधानानंतर पाकिस्तानने बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवादी ठरवले असून बाळासाहेब ठाकरे यांच्यासह 35 मोस्ट वॉन्टेट दहशतवाद्यांची यादी त्यांनी भारताकडे पाठविल्याचे वृत्त पाकिस्तानातील 'डेलिमेल टुडे' या वेबसाइईटने दिली आहे.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर या हल्यांमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे संतापलेल्या भारत सरकारने पाकिस्तानकडे दाऊदसह 20 दहशतवादी ताब्यात देण्याची मागणी केली होती. मग्रुर पाकिस्तानने ही मागणी धुडकावली होती. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी दहशतवादी भारताच्या ताब्यात देणार नाही, असे स्पष्ट करताना मुंबई हल्लाची नाळ पाकिस्तानशी जुडली असेल तर तसे पुरावे पाठवावे, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
दरम्यान, भारताने कडक पावले उचलण्यानंतर पाकिस्ताननेही नाटके सुरू केली असून हिंदुह्रयदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह 35 जणांची 'मोस्ट वॉन्टेड' म्हणून यादी तयार केली असून ही यादी लवकरच भारताला देण्यात येणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे गतवेळीही दहशतवादी प्रकरण अंगलट येत असताना पाकिस्तानने असाच प्रकार केला होता. त्यामध्ये भाजपानेते लालकृष्ण अडवाणी यांना दहशतवादी ठरवून त्यांची मागणी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन पाकिस्तानने पुन्हा एकदा धाडस केले आहे. |