मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत आणि पाकमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या मोहिमेवर असलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री कोंडालिझा राईस यांनी आज पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली. बुधवारी राईस यांनी भारताला भेट देत पाकवर ताशेरे ओढले होते.
मुंबई हल्ल्यांमध्ये पाकचे नाव उघड झाल्यानंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून यामुळे आशियाई देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राईस आपला युरोप दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाल्या. त्यांनी भारतात परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेत यानंतर पाकवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज राईस यांनी झरदारींची भेट घेतली असून, भारताने पाककडे दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीवर पाकने गंभीर विचार करावा असे मत राईस यांनी या प्रसंगी व्यक्त केल्याचे समजते. |