अफगाणिस्तानातील खोश्त भागात सरकारी कार्यालयाच्या परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात दोन जण ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना लक्ष करत हे हल्ले करण्यात आले. दुसरा हल्ला गुप्तहेर कार्यालया जवळ करण्यात आला.
स्फोट करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर गोळीबारही केल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. |