मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये समाविष्ट दहशतवाद्यांना पाक सैन्याचे निवृत्त अधिकारी आणि आयएसआय या गुप्तहेर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचा खुलासा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केला असून, पाक सैन्यालाही या हल्ल्यांची पूर्व कल्पना असल्याचा त्यांचा दावा आहे.
पाक सरकारने जरी यात आपला सहभाग असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असला तरी यात पाक सैन्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त अमेरिकी वृत्त पत्रांनी प्रकाशित केल्याने अमेरिकेने पाकवर दबाव वाढवला आहे. |