दहशतवाद विरोधातील लढाईत आता भारताला चीनचीही साथ लाभली आहे. चीन आणि भारतीय लष्कर लवकरच दहशतवाद विरोधी संयुक्त अभ्यास करणार आहेत.
कर्नाटकात शनिवार पासून या अभ्यासास सुरुवात होणार असून, 14 तारखेपर्यंत हा सराव चालणार असल्याची माहिती चीनची सरकारी एजंसी असलेल्या शिन्हुआने दिली आहे.
2006मध्येच चीन आणि भारत सरकारदरम्यान हा करार करण्यात आला होता. मुंबईत झालेल्या हल्ल्यांचा या अभ्यासाशी कोणताही संबंध नसून, केवळ चीन आणि भारतीय लष्करात सामंजस्य निर्माण होण्यासाठी याचे आयोजन करण्यात आल्याचे चीन लष्कराने स्पष्ट केले आहे. |