ओबामांच्या आगामी प्रशासनाने काश्मीर प्रश्नात आवश्यकतेपक्षा लक्ष न घालण्याचा सल्ला अमेरिकन संसदीय अहवालात देण्यात आला आहे. यामुळे भारताकडून प्रतिकार वाढण्यासोबतच इस्लामाबादच्या बाजूने तोडगा काढण्याची अपेक्षा वाढीस लागेल, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेचे दक्षिण आशियाई धोरणात अधिक क्लिष्टता येऊ शकते. एकोणीस पानी 'टेरॉरीस्ट अटॅक्स इन मुंबई अँड इम्प्लिकेशन्स फॉर यूएस इंटरेस्टस' हा विशेषत १११ व्या कॉंग्रेससाठी तयार करण्यात आलेला अहवाल काल प्रकाशित करण्यात आला आहे. |