पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारी यांच्याशी आपले कोणतेही मतभेत नाहीत असे आज पाकचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी स्पष्ट केले. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेहमूद दुर्रानी यांनी कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे जाहीर केल्यानंतर या दोघांमध्ये मतभेद विकोपाला गेल्याचे पाक प्रसार माध्यमांनी म्हटले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत गिलानी यांनी दोघांचे काही मतभेद नसल्याचे जाहीर केले. बुधवारी दुर्रानी यांनी कसाब हा पाकचा नागरिक असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान गिलानी यांनी या वृत्ताचा इन्कार करत आपल्या कानावर हात ठेवले होते. यानंतर दुर्रानी यांनी आपण या वृत्ताची माहिती झरदारींना दिल्याचे म्हटल्याने पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यात विस्तव पेटला होता. |