इजिप्तच्या सीमेलगतच्या प्रांतातील रफाह शहरात आज इस्त्रायलचे क्षेपणास्त्र कोसळले. यात कोणीही जखमी झाले नाही. परंतु, यानंतर इजिप्तने इस्त्रायलला इशारा दिला आहे. यापूर्वीही गाझात सुरू असलेल्या संघर्षात इजिप्तमधील दोघा पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज पहाटे हे क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर सरकारने हा भाग रिकामा केला असून, क्षेपणास्त्राला निकामी करणे सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मध्यवर्ती भागात हे क्षेपणास्त्र कोसळले. हमासने क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्त्रायलने युद्ध पुकारले असून, या संघर्षात आतापर्यंत 800 पेक्षा जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत. |