मुंबई हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवादी अजमल कसाबच्या प्रकरणात मला पाक सरकारने केवळ बळीचा बनविले असल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानी यांनी केला आहे. पाकिस्तानच्या 'द न्यूज' या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत दुर्रानी यांनी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावर थेट प्रहार केले आहेत.
दुर्रानी यांनी म्हटले आहे, की कदाचित गिलानी यांना असे वाटत असावे की महत्वाचे निर्णय त्यांच्या परवानगी शिवाय घेतले जात होते म्हणूनच त्यांनी तो राग माझ्यावर काढला. मी काहीही चूक केलेली नाही. कसाब पाकिस्तानी असल्याचे मान्य करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चेअंतीच घेण्यात आला होता. |