मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > शरीफ पुन्‍हा 'शरीफ' झाले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शरीफ पुन्‍हा 'शरीफ' झाले
पुरावे गंभीरतेने घेण्‍याचा सल्‍ला
भाषा
मुंबई हल्‍ल्‍यानंतर पुन्‍हा एकदा पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताच्‍या बाजूने बोलताना युसूफ रजा गिलानी सरकारला टीकेचे लक्ष्‍य केले आहे. भारताने हल्‍ल्‍यासंदर्भात दिलेले पुरावे सरकारने गंभीरपणे घेऊन तपास करावा अशी मागणी त्‍यांनी केली आहे. यापूर्वीही कसाब हा पाकिस्‍तानी नागरिक असून मी त्‍याच्‍या आई-वडीलांना भेटल्‍याचे त्‍यांनी मान्‍य केले होते.

पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी कालच भारताने हल्‍ल्‍यासंदर्भात पक्के पुरावे दिले नसल्‍याचे म्‍हटले होते. त्‍या संदर्भात शरीफ यांनी गिलानी यांच्‍या या वक्‍तव्‍याचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख असलेल्‍या नवाज शरीफ यांनी सरकारला ठासून सांगितले आहे, की पुराव्‍यांना गंभीरपणे घेऊन वस्‍तूनिष्‍ठ चौकशी केली जावी. अन्‍यथा भारतासह आंतरराष्‍ट्रीय समुदायाला पाकने पुराव्‍यांची चौकशी केली नाही, असे बोलण्‍याची संधी मिळू शकते.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
हमास विजयाच्‍या उंबरठ्यावरः हानिया
'भारताने पक्‍के पुरावे दिलेले नाहीत'
हल्‍ल्‍यासाठी 'लश्कर'च जबाबदारः ब्रिटन
पाक नेत्यांना मनमोहन यांनी दिल्या शुभेच्छा
पाक कलाकारांनाही भीती दहशतवाद्यांची
पाकमध्‍ये भारतीय चॅनल्‍सवर बंदीची मागणी