मुंबईवरील हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबामध्ये फूट पडली असल्याची माहिती समोर आली असून एका वृत्तपत्रात प्रकाशित बातमीनुसार लश्करचा कमांडर जकी-उर-रहमान लखवी हा जमात-उद-दावा आणि त्यांचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर प्रचंड नाराज आहे. या संघटनेने लखवी आणि लश्करच्या एका कमांडरशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते. |