प्रतिबंधित संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद यास नजरकैदेतून मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात पाकिस्तानातील पंजाबा प्रांत सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारने लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली असून या याचिकेत म्हटले आहे, की सईदच्या ‘सुरक्षेसाठी’ त्याला नजरकैदेत ठेवणे आवश्यक आहे. |