मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > निकालापूर्वीच उत्तर पत्रिका रद्दीत!
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
निकालापूर्वीच उत्तर पत्रिका रद्दीत!
परीक्षा दिली आणि निकालाच्‍या प्रतिक्षेत असताना जर तुमच्‍या उत्तर पत्रिकेच्‍या कागदात एखाद्या भेळवाल्‍याने किंवा ढाब्यावाल्‍याने भजी बांधून दिली तर...? कल्‍पना करणेही असह्य वाटते ना. मात्र असा प्रकार घडलाय. पाकिस्तानच्‍या बलूचिस्तान बोर्ड ऑफ इंटरमिडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन बोर्डाच्‍या परीक्षेच्‍या उत्तर पत्रिका एका ढाब्‍यावर रद्दीत विकण्‍यात आल्‍या आहेत. एप्रिलमध्‍ये झालेल्‍या या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर होणे बाकी असताना हा प्रकार घडला आहे.

राजधानी कोटाच्‍या एका स्थानिक अधिका-याने यास दुजोरा दिला आहे. या उत्तर पत्रिका एका स्थानिक ढाब्‍यावर आढळून आल्‍या आहेत. शिक्षण मंत्री शफीक अहमद अवान यांनी या घटनेबाबत आश्‍चर्य व्‍यक्त केले असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
सईदच्‍या मुक्ततेविरोधात पाकमध्‍ये याचिका
एअर फ्रांस विमान कुठेही न तुटता सरळ समुद्रात
कश्मीर प्रश्‍नी हस्‍तक्षेप नाहीः अमेरिका
पाक-अफगाण सीमेवर सैन्‍य तैनाती
स्‍वातमधून दहशतवादाचा खात्माः कुरैशी
रावळपिंडीत स्फोट: सहा ठार