तालिबानी नेता बैतुल्ला महसूद विरोधात पाक आणि अमेरिकी सैन्याने जोरदार मोहीम आखली असली तरी, पाकमध्ये आणखी आत्मघाती हल्ले घडवून आणण्यासाठी आता बैतुल्लाने मुलं विकत घेण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकी संरक्षण विभागाने या संबंधीचा एक अहवाल तयार केला असून, यात ही माहिती देण्यात आली आहे. दहा वर्षाखालील ही मुलं पाकच्या स्वात आणि वझिरीस्तान भागातील आहेत.
यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानातून गायब होणाऱ्या मुलांविषयी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. पैशांच्या लालसेपोटी गेल्या काही दिवसांपासून पाकच्या अनेक शहरांतून मुलं पळवण्याचे काम काही टोळ्या करत आहेत. |