पाकिस्तानच्या अशांत कबायली भागात वजीरिस्तानमध्ये आज अमेरिकेच्या ड्रोन विमान आणि पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 18 दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात स्थलसेनेनेही तालिबानचा मोस्अ वॉन्टेड कमांडर बैतुल्ला मसूद विरोधात अभियान सुरू केले आहे. दक्षिण वजीरिस्तानच्या सारोकई भागात दहशतवाद्यांच्या एका शिबिरावर अमेरिकन ड्रोन विमानांनी तीन क्षेपणास्त्रे सोडली. त्यात 13 दहशतवादी ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. |