उत्तर कोरियाने शनिवारी सकाळी स्कॉड श्रेणीच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची क्षमता 500 किलोमीटर होती.
उत्तर कोरियाने सकाळी आठ वाजता कमी पल्ल्याचा दोन स्कॉड क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. अमेरिकेच्या स्वतंत्र दिवसाचा मुर्हूत साधून कोरियाने ही चाचणी घेतली. यापूर्वी एप्रिल महिन्यात लांब पल्लाचा क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर 25 मे रोजी अणूचाचणी घेतली होती. |