पाकिस्तानच्या अशांत कबायली भागात एका सैन्य हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला असून त्यात असलेले सर्व 26 जवान ठार झाले आहे. दरम्यान तालिबानने हा अपघात नसून आपण ते हेलिकॉप्टर पाडले असा दावा केला आहे.
पाकिस्तानी आधिकारिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियन बनावटीचे एमआय-17 हेलिकॉप्टर पेशावरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर अपघातग्रस्त झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असून त्यात 26 जवान ठार झाले आहेत. |