आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » झरदारींना सत्ता सोडावी लागणार!
Feedback Print Bookmark and Share
 
दहशतवादाचा सामना करावा लागत असलेल्‍या पाकिस्तानला सावरण्‍यास आणि सुरक्षा देण्‍यात अपयशी ठरलेल्‍या राष्ट्राध्‍यक्ष आसिफ अली झरदारी यांनी एकतर सत्ता सोडावी अन्‍यथा आपल्‍या कार्यकारी अधिकारांचा त्याग करावा, असा सल्‍ला पाकमधील बुध्‍दीवंतांनी दिला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'द न्यूज'ने या संदर्भात राजकीय तज्‍ज्ञ, ज्‍येष्‍ठ अधिकारी आणि झरदारींचे सहका-यांशी चर्चा केल्‍यानंतर याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. झरदारींसाठी पुढील एक-दोन महीने अतिशय कठिण असतील असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

झरदारी यांना यापूर्वीचे पाक राष्‍ट्राध्‍यक्ष रफीक तरार आणि फजल इलाही चौधरी यांच्‍या प्रमाणे केवळ नामधारी सत्तेत राहून अधिकारांचा त्‍याग करावा लागण्‍याची शक्यता आहे.
संबंधित माहिती शोधा