पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि लाहोरसह देशातील अनेक भागात आज रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.0 इतकी होती. या भूकंपात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली असल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
गुरुवारी रात्री 11.44 च्या सुमारास इस्लामाबादसह लाहोर व परिसरातील काही भागात सुमारे 30 सेकंदांचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या हिंदुकूश पर्वतात होते.