आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » अलकायदा नेते पाकमध्‍येचः हिलरी
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्‍तान सरकारला तालिबानी आणि अलकायदा नेते कुठे आहेत हे माहीत नाही यावर विश्‍वास ठेवणे आपल्‍याला शक्य नसून हे नेते पाकमध्‍येच सरकारच्‍या मदतीने लपून बसले आहेत, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन अमेरिकन परराष्‍ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी केले. अलकायदा नेते पाकमध्‍ये नाहीत या पाक सरकारच्‍या पवित्र्यावर आपल्‍याला विश्‍वास ठेवणे अवघड जात असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

हिलरी यांनी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्‍या संपादकांच्‍या भेटी प्रसंगी सांगितले, की अलकायदा वर्ष 2002 पासून पाकिस्तानमध्‍येच आश्रयाला आहे. मला हे ऐकून नक्कीच आश्‍चर्य वाटते की हे नेते कुठे आहेत ते सरकारमधील कुणालाही माहीत नाही. आणि पाकिस्‍तान ठरवूनही त्यांच्‍यापर्यंत पोचू शकत नाही हे त्याहून जास्‍त आश्‍चर्यचकीत करणार आहे.
संबंधित माहिती शोधा