पाकिस्तानी अधिकारी आणि दहशतवादी यांच्यातील संबंधांचा नव्याने पर्दाफाश झाला आहे. भारतात हल्ले घडवून आणण्याच्या अनेक योजनात प्रत्यक्ष हात असणार्या दोन अतिरेक्यांशी पाकिस्तानच्या शिकागोतील दूतावासातील प्रमुख अधिकार्याचे संबंध असल्याचा दावा एफबीआयने केला आहे.
डेव्हिड कोलमन आणि तहाव्वूर हुसैन राणा अशी या दोन अतिरेक्यांची नावे असून लष्कर ए तोयबाच्या वतीने त्यांनी अनेक दहशतवादी कारवाया भारतात घडवून आणल्या आहेत. एफबीआयने त्यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानी सरकारशी असलेल्या संबंधाचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानचे शिकागोतील दूतावासाचे प्रमुख डॉ. अमन रशीद यांची व या दोन दहशतवाद्यांची ओळख असल्याचे एफबीआयच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळेच एफबीआयने आपल्या आधीच्या आरोपपत्रात दुरूस्ती करून नव्याने ते दाखल केले आहे. राणा, हेडली उर्फ दाऊद गिलानी आणि रशीद हे तिघेही एकाच शाळेत शिकत होते.