आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » पाकसाठी सध्‍याचा काळ अवघड: अमेरिका
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तानमध्‍ये तालिबान आणि दहशतवादी हल्‍ल्‍यांमध्‍ये वाढ झाली असून शेकडो निरपराध लोक मारले गेले आहेत. सध्‍याची ही स्थिती या देशासाठी अतिशय कठीण काळ असल्‍याचे अमेरिकन परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इयान केली यांनी सांगितले.

केली म्हणाले, की पाकिस्तानसाठी सध्‍याचा काळ खूपच अडचणीचा आहे. त्‍यांना क्रूर दहशतवादी आणि अंतर्गत हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. गेल्‍या काही आठवड्यांमध्‍ये पाकमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांचा उल्‍लेख करताना केली म्हणाले, की गेल्‍या काही दिवसांमध्‍ये उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तानात अभियाना दरम्‍यान बॉम्ब हल्‍ले आणि हत्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. त्‍यांनी सांगितले की ओबामा प्रशासनाच्‍या दृष्‍टीने पाकसाठी हा सर्वांत मोठा अडचणीचा काळ आहे.
संबंधित माहिती शोधा