पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील एका न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना त्यांच्या कार्यकाळा दरम्यान कथित रित्या ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तीचा शोध लावण्यास असहकार्य केल्याबद्दल फरार आरोपी घोषित केले असून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
वायव्य सरहद्द प्रांतातील अबोताबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एका बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश दिले आहेत.
बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोप लावला आहे, की त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अपहरणामागे मुशर्रफ यांचा हात आहे.