बलुचिस्तानातील अस्थिरतेमागे भारताचा हात असल्याची ओरड करून शेवटी तोंडघशी पडाव्या लागलेल्या पाकने आता दक्षिण वजीरिस्तानातील तालिबानी दहशतवादामागेही भारताचा हात असल्याचा आरोप केला असून आपल्याकडे याबाबतचे पक्के पुरावे मिळाले असून आपण ते भारताला देणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी सूचनामंत्री कमर जमां कॅरा आणि सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल अतहर अब्बास यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला.
कॅरा यांनी या संदर्भात भारताच्या समोर मांडणार असल्याची माहिती दिली असून असे असले तरीही पाकिस्तान शांतता प्रक्रिया सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
मेजर जनरल अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार शेरावांगी भागात कानीगुरम जवळ भारतीय शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा, दस्तऐवज, चिकित्सा उपकरण आणि औषधी आढळून आल्या आहेत.