आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » चीनचे दुतोंडी धोरण उघड, डॅमचे काम सुरूच
Feedback Print Bookmark and Share
 
PR
चीन, भारत आणि आंतरराष्‍ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत असून ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बनवत नसल्‍याचा दावा करणा-या चीनचा खोटारडेपणा सॅटेलाईटवरील चित्रातून उघड झाला आहे. नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्‍सीने या संदर्भात घेतलेल्‍या छायाचित्रावरून चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बनवित असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

बुधवारच्‍या 'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्रात या संदर्भात प्रकाशित झालेल्‍या वृत्तानुसार चीनने ब्रह्मपुत्र नदीवरील आपल्‍या भागात झांगमू येथे धरणाचे भरपूर काम पूर्ण केले असून भारताने याबाबत विचारणा केली असता यापूर्वी असे कुठलेही धरण बनवित नसल्‍याचे म्हटले आहे.

चीनच्‍या या कृतीमुळे दोन्‍ही देशातील संबंध आणखी तणाव निर्माण होण्‍याची शक्यता आहे.

हे धरण बनल्‍यास भारतासाठी हा मोठा धोका ठरणार आहे. या नदीवर धरण बनल्‍यास चीन नेहमीच येथील पाणी अडवून ठेवू शकणार आहे. अशा परिस्थितीत धरण फुटल्‍यास अरुणाचल आणि इशान्‍येक‍डील राज्‍यांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.

हे धरण बनत असलेल्‍या ठिकाणी नदी भारतात प्रवेश करण्‍यापूर्वी मोठा वळसा घेते. या ठिकाणी 200 किलोमीटर आत सुमारे 3000 मीटर ऊंची वरून खाली कोसळते. त्‍यामुळे ही जागा चीनसाठी हाइड्रोपावर निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वाची आहे. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र असल्‍यानेही धरणाला धोका आहे.

या धरणाच्‍या मदतीने चीन आपल्‍या दुष्‍काळग्रस्‍त जिनजियांग आणि गानसू भागाकडे पाणी वळविणार आहे. त्‍यासाठी नदीचा अनेक हजार किलोमीटरचा रस्‍ता बदलेल. त्‍यासाठी चीन या भागात लहान-लहान न्यूक्लियर स्‍फोट घडवून हिमालयात टनेल बनविणार आहे. हे धोकादायक तर आहेच. शिवाय दोन्‍ही देशांच्‍या सीमांसंदर्भातील वादही यामुळे उफाळू शकतो.

शिवाय भारत आणि बांग्लादेशला दुष्‍काळाच्‍या काळात पाण्‍यासाठी चीनवर अवलंबून रहावे लागणार आहे.
संबंधित माहिती शोधा