कॅनडात शरणार्थी म्हणून प्रवेश करताना अटक करण्यात आलेल्या श्रीलंकन तमीळींचे संबंध लिट्टेशी असल्याची माहिती कॅनडाच्या सुरक्षा अधिका-यांनी दिली असून या 76 लोकांवर देशासाठी धोका असल्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
या प्रकरणाची सुनावणी एक पॅनल करीत असून या पॅनलच्या प्रवक्त्या पाउला फेबर यांनी याबाबत सांगितले, की कॅनडा सरकारने या शरणार्थींचे संबंध लिट्टे असल्याची माहिती दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या लोकांकडून जप्त करण्यात आलेल्या जहाजातून शस्त्रांस्त्रांची तस्करी केली जात असल्याचा आरोप करून या लोकांना देशासाठी धोका असल्याचे ठरविण्यात आले आहे.