पाकमधील परिस्थिती बिघडत आहे. यात लष्कर राजवटीचा देशातील इतिहास पाहता आता राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनाही लष्कर राजवटीची भीती सतावत असून, देशात सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.
पंतप्रधान गिलानी यांनीही त्यांच्या या प्रयत्नात आपले योगदान दिले असून, देशातील विरोधी पक्षांना एकत्र करत लष्कर मधील असंतुष्ट अधिकाऱ्यांना दडा शिकवण्याची त्यांची योजना आहे.
पाक सैन्य प्रमुख कियानी तख्तपालट करून संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यासाठी गिलानी आणि झरदारी यांनी सहकारी पक्षांसह विरोधी पक्षातील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट), जमीयतुला इस्लामी, मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट, या पक्षांशी या विषयावर चर्चा केली आहे.